विशेष प्रतिनिधी
बीड : Vijay Sivatare अजित पवार हे परखड नेतृत्व आहे. मात्र महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना, वाल्मिक कराड याचं साम्राज्य आणि त्यातून विषवल्ली निर्माण झाली. पण त्यांना काही वाटत नाही त्याचे शल्य आहे, अशी टीका करत माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार विजय शिवतारे यांनी बीड प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.Vijay Sivatare
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथेभेट दिली आहे. त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरुन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.
शिवतारे म्हणाले, आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने येथे आलो आहोत. मी येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. अत्यंत वाईट आणि निर्घृण पद्धतीने ही हत्या झाली असून आतापर्यंत कोणत्याही सरपंचाची अशा प्रकारे हत्या झालेली नाही, हे गंभीर प्रकरण असून मुख्यमंत्री स्वत: चाणक्य आहेत आणि स्वत: वकील असल्याने त्यांना कायद्याचा अभ्यास आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतील असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
अजितदादा यांचे नेतृत्व परखड आहे. परंतू जी गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते. वाल्मीक कराड याचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली विषवल्ली यांचं त्यांना काहीच वाटत नाही याचे शल्य वाटते. परळी येथील या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका. मी दादांना आवाहन करतो. अख्खा महाराष्ट्र म्हणत आहे हे चुकीचं झालं आहे, त्यामुळे त्यांनी प्रखर भूमिका घ्यावी आणि चुकीचा पायंडा पाडू नये ही प्रामाणिक विनंती आहे. अजितदादा काही पोलीस ऑफिसर नाहीत. आपण धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलणार नाही. पण ही विषवल्ली मोडण्याची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जाऊन बोलावे मग त्यांना खरे वास्तव माहिती पडेल असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.
मस्साजोग प्रकरणात ज्या गोष्टीसमोर आल्या आहेत त्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये 1967 साली अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. तोच बेस मला परळीत दिसून येत आहे. जे मी या ठिकाणी लोकांकडून ऐकले ते भयावह आहे. गुंडाला कोणतीही जात नाही, त्या साम्राज्यामागे तो लोकांना वापरून घेतो. काही लोक इथे येऊन ओबीसी लोकांवर अन्याय होतो असे बोलतात हे चुकीचे आहे. देशमुख यांच्या हत्याऱ्यांना फासावर लटकवणे आवश्यक आहे. वाल्मिक कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतं असेही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App