अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं, तरी निधी वाटप फडणवीसांच्या सूचनेनुसारच – रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders

राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करायचे मात्र मात्र आता त्यांनी मागील काही दिवसांपासून अजित पवारांवरही निशाणा साधणे सुरू केले आहे. आता त्यांनी अजित पवारांकडे अर्थ खातं असलं तरी निधी वाटपाच्या सूचना फडणीसाच देतात आणि त्यानुसार निधी दिला जातो असा आरोप केला आहे. Although the finance account is with Ajit Pawar the allocation of funds is as per Fadnavis instructions  Rohit Pawar

रोहित पवारांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे की, ”माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?”
याशिवाय ”राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतोय, पण ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय!” असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

याचबरोबर आपल्या ट्वीटसोबत इमारतीच्या अर्धवट बांधकामचे फोटो शेअर करत रोहित पवारांनी म्हटलं आहे की, ”हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?”

Although the finance account is with Ajit Pawar the allocation of funds is as per Fadnavis instructions  Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात