अभिजीत पानसे यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे दिसत आहे.After Rupali Thombre Patil, Abhijit Panse will also say goodbye to MNS
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज सकाळी पुण्यातील मनसेच्या वरिष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे देखील मनसेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
ते काही वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांचा एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. याप्रसंगी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहीती मिळतेय.
अभिजीत पानसे ही रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पाठोपाठ मनसेला रामराम करणार का..? हा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे. आगामी काळात पानसे काय निर्णय घेतात याकडे त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App