दंगलीच्या मुद्द्यावर काका-पुतण्याची एकच भूमिका? आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला दिली सहमती

विशेष प्रतिनिधी

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात लोकांचे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात दंगली घडवल्या जाऊ शकतात, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेला दावा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या या वक्तव्याशी सहमती दर्शवत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. Aditya Thackeray

मुंबईतील मुलुंड पूर्व येथे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाने स्वाक्षरी अभियान सुरू केले. या अभियानात सहभागी झालेल्या आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना एक व्हिडिओ दाखवत मुलुंडमधील मोकळ्या जागांबाबत भाजपवर आरोप केले.

राज ठाकरे यांच्या दंगलींबाबतच्या इशाऱ्याविषयी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना विविध ठिकाणांहून मिळणाऱ्या माहितीतून “कुठेतरी षडयंत्र दिसत आहे”.

“मी रात्री लालबागमध्ये आमच्या मुलांना भेटायला गेलो होतो. सर्वांकडून जे काही समजत आहे, त्यातून कुठेतरी षडयंत्र दिसत आहे. जात, पात, धर्म आणि प्रांत बाजूला ठेवून तरुण एकत्र येत आहेत. देश भाजपच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे दंगली घडवून धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.



मुलुंडमधील सरकारी आरक्षित भूखंडांबाबतही आदित्य ठाकरे यांनी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्यावर निशाणा साधला. कोटेचा हे आरक्षित भूखंड, पेट्रोल पंप आणि डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पांचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मुंबईमध्ये जिथे जिथे भाजप मोकळ्या जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे आम्ही आंदोलन करू. बांद्रामध्ये नेव्हिल डिसोजा ग्राउंड वाचवण्यासाठी आम्ही रेड कार्ड आंदोलन केले होते. आता मुलुंडमध्येही अशाच प्रकारे जागा वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे,” असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मिहीर कोटेचा यांच्या विरोधात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेचा उल्लेख करत त्यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला.“मिहीर कोटेचा लोकांसमोर खोटे बोलत आहेत. आज ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून आम्ही पुरावे दाखवले,” असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे गटाने कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Aditya Thackeray backs Raj Thackeray’s warning of riots to divert attention from public issues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात