Abhijit Deepke : ‘CJP’च्या अभिजीत दीपकेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त; आई-वडिलांशी संपर्क नाही, पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची शक्यता

Abhijit Deepke

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : hijit Deepke सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) माध्यमातून देशातील व्यवस्था व बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दीपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे देशात खळबळ माजली आहे. परिणामी, खबरदारी म्हणून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवला आहे.hijit Deepke

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच अर्थात झुरळांची उपमा दिली होती. त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटलेत. अभिजीत दीपके नामक छत्रपती संभाजीनगर येथील एका मराठी तरुणाने सरन्यायाधीशांच्या विधानाविरोधात चक्क कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या पार्टीला सोशल मीडियात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, प्रस्थापित पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.hijit Deepke



वाळूज स्थित घराबाहेर बंदोबस्त तैनात

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी खबरदारी म्हणून अभिजीतच्या वाळूज येथील घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याठिकाणी पोलिसांची एक व्हॅनही उभी आहे. विशेष म्हणजे अभिजीतच्या आई-वडिलांशी सध्या कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिजीत दीपके व त्याच्या कॉकरोच जनता पार्टीविषयी लोकांमध्ये फार उत्सुकता आहे. त्याचे वेगळे पडसाद उमटू नये म्हणून खबरदारीस्तव त्याच्या घराबाहेर पोलिस संरक्षण तैनात करण्यात आले आहे. ही सुरक्षा पुढील काही दिवस अशीच राहील, अशी माहिती संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली.

अभिजीत दीपकेला काय मिळाली होती धमकी?

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अभिजीत यांनी शुक्रवारी स्वतः ‘एक्स’वरून ही धमकी मिळाल्याची माहिती दिली. त्यांनी धमकी देणाऱ्याचे स्क्रीनशॉटही जाहीर केले. तसेच संबंधित व्यक्तीचा एक व्हिडिओही पोस्ट केला. अभिजीतने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये नमूद आहे की, तुला हवे तितके पैसे मिळतील, तुझे हे कॉकरोच जनता पार्टीचे अकाउंट तात्काळ बंद कर, नाही तर सरळ भाजपमध्ये प्रवेश कर. आमचे ऐकले नाही, तर तू सध्या राहत असलेल्या अमेरिकेतही तुला शोधून मारून टाकले जाईल. या धमकीनंतर जगभरातील नेटकऱ्यांनी अभिजीत दीपकेच्या सुरक्षेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

कोण आहे अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हा सोशल मीडियावरील कॉकरोच जनता पार्टीचा सर्वेसर्वा आहे. कॉजपची स्थापना झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांत इन्स्टाग्रामवर 1 कोटी 82 लाख फॉलोअर्स मिळाले होते. पण आता हे इन्स्टा अकाउंट बंद आहे. अभिजीतच्या आईचे नाव अनिता, तर वडिलांचे नाव भगवानराव दीपके असे आहे. हे कुटुंब संभाजीनगरच्या वाळूज येथील बजाजनगरात राहते. त्याचे वडील एमआयडीसीमध्ये अभियंता होते. आता ते रिटायर झालेत. त्याची आई गृहिणी आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी हे दीपके कुटुंबीयांचे मूळ गाव आहे. नोकरी निमित्त हे कुटुंब छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले.

अभिजीतचा जन्म 29 सप्टेंबर 1995 रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण संभाजीनगरच्याच एका इंग्रजी शाळेत झाले. त्याने पुण्यात टिळक विद्यापीठातून मास कम्युनिकेशन केले. त्यानंतर 3 वर्षे त्याने आम आदमी पार्टीसाठी काम केले. त्यानंतर एमएससाठी 2023 मध्ये अमेरिकेत गेला. तत्पूर्वी, त्याची बहीण वर्षा एमएससाठीच अमेरिकेत गेली होती.

Police Protection Outside Abhijit Deepke’s House Over CJP Death Threats

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात