चिंचवडच्या चापेकर स्मारकाला 41 कोटींचा निधी; मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंचा शब्द!!

प्रतिनिधी

मुंबई : भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर हुतात्मा चापेकर बंधूंनी रँड या क्रूरकर्मा ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला. अशा वीर क्रांतिकारक बंधूंच्या तेजाला साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड येथे उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे.41 crore fund for Chinchwad Chapekar Memorial Chief Minister Eknath Shinde words

क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बोलवली होती.



यावेळी चापेकर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले.

क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीस आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, चापेकर समितीचे गिरीष प्रभूणे, मिलिंद देशपांडे, रविंद्र नामदे, अमोल थोरात, गोरडे आदी उपस्थित होते.

41 crore fund for Chinchwad Chapekar Memorial Chief Minister Eknath Shinde words

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात