चिनी ड्रॅगनला कोंडीत पकडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न, मित्र देशांना भरघोस मदत करणार


विशेष प्रतिनिधी

जाकार्ता – हिंद प्रशांत क्षेत्रातील चीनच्या विस्तारवादी आणि आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आशियातील मित्रदेशांबरोबर लष्करी आणि आर्थिक संबंधांत वाढ करेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.USA will support other nations against China



ब्लिंकन म्हणाले, ‘‘हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. यासाठी आम्ही नवीन देशांशी मैत्रीचे संबंध निर्माण करत आहोत. त्याचप्रमाणे या शांततेला अडथळा येऊ नये म्हणून लष्करालाही सज्ज ठेवत आहोत.

मात्र, आमचे मित्र देश आणि भागीदार देश हीच आमची खरी ताकद आहे.’’ चीनच्या वाढत्या आक्रमकपणाला आळा घालण्यासाठी आम्ही दक्षिण आशियातील देशांशी चांगले संबंध निर्माण करत आहोत. मात्र, अमेरिका किंवा चीन यातील एक पर्याय निवडण्याची कोणत्याही देशावर सक्ती करत नाहीत. या प्रदेशात शांतता कायम टिकवून राहणे, हेच आमचे उद्दीष्ट आहे, असेही ब्लिंकन म्हणाले.

USA will support other nations against China

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात