जॉन्सन’च्या लशीवरील बंदी अमेरिकेने अखेर उठविली, लशीचा एकच डोस प्रभावी


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : कोरोनाला रोखण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा एकच डोस देण्यात येतो. या लशीमुळे होणाऱ्या संभावित नुकसानापेक्षा लाभ अनेक असल्याचे आढळल्याने त्यावरील बंदी उठविण्याची शिफारस विशेषज्ञांच्या समितीने केली होती.USA uplifts ban on Jhonson and Jhonsan

त्यानंतर आता अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा वापर पुन्हा करण्यात येणार आहेत.ही लस टोचल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे लसीकरण मोहीम १४ एप्रिलपासून थांबविण्यात आली होती.अमेरिकेत ८० लाख नागरिकांनी ही लस देण्यात आली आहे. त्यापैकी १५ जणांच्या रक्तात वेगळ्या प्रकारच्या गुठळ्या झाल्याचे दिसून आले होते. हा त्रास होणाऱ्या सर्व महिला होत्या आणि बहुतेकजणी ५० वर्षांच्या आतील होत्या.

यातील तीनजणींचा मृत्यू झाला तर सातजणी रुग्णालयात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) सह संयुक्त निवेदन प्रसिद्घ केले आहे.

‘‘कोरोनाशी लढा देण्यासाठी ‘जॉन्सन’ची लस महत्त्वपूर्ण आहे. मात्र ही लस घेण्याचा पर्याय निवडणाऱ्या तरुण महिलांना त्याच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात येईल असेही त्यात म्हटले आहे.

USA uplifts ban on Jhonson and Jhonsan

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती