चिनचे ‘ हे ‘ शहर जितकी मुले तितके पैसे देणार..वाचा सविस्तर


वृत्तसंस्था

बिजिंग : आता तर हद्दच झाली.चिनमधील पंझिहुआन शहराने लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक मुलामागे रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. चीनमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असून, जन्मदर वाढवण्यासाठी संघर्ष करीत आहे.The ‘this’ city of China will pay as much as the children..read in detail

चिनच्या सिचुआन नैर्ऋत्येकडील प्रांतातील पंझिहुआन शहरातल्या सरकारने बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. पंझिहुआन प्रशासन स्थानिक कुटुंबीयांना प्रति मुलाच्या मागे दरमहा 500 युआन (77 डॉलर) देणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 1.2 मिलियन लोकांचे शहर, जे स्टील उद्योगासाठी ओळखले जाते, स्थानिक घर नोंदणी असलेल्या मातांना मोफत प्रसूती सेवा देते आणि कामाच्या ठिकाणी जवळ अधिक नर्सरी शाळा बनवणार आहे.

तसेच मे महिन्यातील सर्व विवाहित जोडप्यांना तीन मुले होण्याची परवानगी देण्याच्या निर्णयानंतर चीन सरकारने या महिन्याच्या सुरुवातीपासुन 2025 पर्यंत मुलाचा जन्म,  तसेच पालकत्व आणि शैक्षणिक खर्चात मदत करण्याचे वचन दिले.

या अहवालानुसार हे शहर पात्र ठरलेल्या योग्य संशोधक, शिक्षक, वैद्यकीय व्यावसायिक आणि उद्योजकांना रोख बोनस देणार आहे.चिनचे सरकार नागरिकांना जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे

The ‘this’ city of China will pay as much as the children..read in detail

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण