पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परतणार नाहीत देशात


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पूर्णपणे बरे होईपर्यंत देशात परतणार नाहीत, असे त्यांचे बंधू व पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शहबाज शरीफ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा व्हिसा वाढविण्याबाबत ब्रिटनचे न्यायाधीकरण जोपर्यंत निर्णय घेत राहील, तोपर्यंत ते कायदेशीररीत्या तेथे राहू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.The former Prime Minister of Pakistan will not return to the country

शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. ते नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये राहत आहेत. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी उपचारासाठी विदेशात परवानगी दिली होती. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने व्हिसा वाढविण्याबाबत अर्ज फेटाळला आहे.



मुस्लिम लिगचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मेडिकल बोर्डाच्या अहवालाच्या आधारावर नवाज शरीफ यांना उपचारासाठी पाकिस्तानबाहेर जाण्याची परवानगी दिली होती. तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांच्या आरोग्याबाबत राजकारण करणे अमानवीय आहे.

सरकारी यंत्रणा शरीफ यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, यामुळे देशाची बदनामी होत आहे, हे त्यांना समजत नाही.शरीफ हे जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाहीत व लंडनमधील डॉक्टर जोपर्यंत त्यांना देशवापसीची (प्रवासाची) परवानगी देत नाहीत, तोपर्यंत ते परतणार नाहीत.नवाज शरीफ यांची कन्या व पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका केली आहे.

The former Prime Minister of Pakistan will not return to the country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात