त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, पायी जात असताना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

आगरताळा : पायी जात असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारघडल आहे. ही मोटार पायी चालत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळून गेली. या घटनेत मुख्यमंत्री बचावले, पण त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्रिपुरा पोलिसांनी तीन जणांना अटक केली. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Attempted assassination of Tripura Chief Minister

गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री पूर्ण सुरक्षेसह श्यामा प्रसाद मुखर्जी लेनवर संध्याकाळी फिरायला गेले होते. हे ठिकाण त्याच्या निवासस्थानाजवळ आहे. मात्र एक मोटार मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा वतुर्ळात शिरली. ती गाडी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने येत होती, पण मुख्यमंत्र्यानी उडी मारली आणि बाजूला झाले. यामुळे त्यांना इजा झाली नाही, परंतु त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाºयाला किरकोळ दुखापत झाली.



पोलीस अधिकारी म्हणाले की ही घटना कोविड नाईट कर्फ्यू दरम्यान घडली आणि तीन तरुणांनी केवळ कर्फ्यू नियमांचे उल्लंघन केले नाही तर बेकायदेशीरपणे सहा पोलीस बॅरिकेड्स देखील ओलांडले. या तीन मद्यधुंद तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एका पोलिसावर हल्ला केला.

Attempted assassination of Tripura Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात