सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : सध्याच्या काळात सोशल मीडिया हे बेलगाम घोड्यासारखेआहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा. मात्र, हे करताना तुम्हाला सावध रहावे लागेल. तुम्ही सावध नसाल तर मीडिया ट्रायलला बळी पडू शकता, असा कानमंत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.Social media is like an unbridled horse, train to get control and get ready, appeals Yogi Adityanath

त्तर प्रदेशातील एका स्थानिक घटनेचा हवाला देत त्याबद्दल इतर देशांमध्ये कशा पद्धतीने मीडिया ट्रायल सुरू झाली असल्याचे सांगत पेगासस प्रकरणाचा संदर्भ देत योगी आदित्यनाथ त्यांनी आयटी सेलच्या कर्मचाºयांना शुभ मुहूर्ताची वाट न पाहता त्वरित काम सुरू करण्यास सांगितले.



भारतातील मीडियाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, एकेकाळी वर्तमानपत्रं आणि टेलिव्हिजन माध्यमांना मालक आणि संपादक होते. मात्र, या सोशल मीडिया नावाच्या प्रकराला कोणीच वाली नाही. प्रिंट आणि व्हिज्युअल माध्यमांवर नियंत्रण होते.

मात्र, सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. जर तुम्ही सतर्क आणि तयार नसाल तर तुम्ही मीडिया ट्रायलचा विषय व्हाल. त्यामुळे या बेलगाम घोड्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि तयारी खूप गरजेची आहे.

सोशल मीडियाचे महत्त्व पटवून देत आदित्यनाथ यांनी लोकांना सोशल मीडियाचा वापर लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी करण्याचे आवाहन केले.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसती तर राम मंदिराचा वाद इतक्या शांततापूर्ण स्थितीत सोडवणं शक्य झालं असतं का?असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना केला.

Social media is like an unbridled horse, train to get control and get ready, appeals Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात