गाईंची घेता तशीच लोकांचीही काळजी घेता का? गुजरात उच्च न्यायालयाचा गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गाईंची काळजी घेता तशीच तुमच्या परिसरातील लोकांचीही प्रशासनाकडून अशीच काळजी घेतली जाते का? असा सवाल गुजरात उच्च न्यायालयाने गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.Do you take care of people like cows? Gujarat High Court questions Gir-Somnath District Collector

गुजरात उच्च न्यायालयात एका व्यक्तीविरुध्द जनावरांशी क्रुरपणे वागल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने गुरांना अशा प्रकारे बांधले होते की ते पाणी पिऊ शकत नव्हते. त्यामुळे क्रुरतेच्या कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याचे आदेश दिले. आपल्या अटकेला त्याने न्यायालयात आव्हान दिले आहे.



न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे याबाबत सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले,  गायींचे संरक्षण करणे ठीक आहे. पण मुले आणि इतर लोकांसाठीही अशीच काळजी घेतली जात आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली.

न्यायालयान अशा प्रकारचा  प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. 28 जूनच्या आदेशात न्यायालयाने असाच प्रश्न विचारला होता. पण त्याचे उत्तर दिले गेले नाही. त्यमाुळे आता न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना १३ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांसह उत्तर दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. तोपर्यंत अटक करण्याचा जिल्हाधिकाºयांना अधिकार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

Do you take care of people like cows? Gujarat High Court questions Gir-Somnath District Collector

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात