पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी फेरनिवड


पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची लेबर पार्टीच्या उमेदवारीवर लंडनच्या महापौरपदी फेरनिवड झाली आहे. त्यांना ५५.२ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ४४.८ टक्के मते मिळाली.Sadiq Khan, of Pakistani descent, re-elected as Mayor of London


विशेष प्रतिनिधी

लंडन : पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची लेबर पार्टीच्या उमेदवारीवर लंडनच्या महापौरपदी फेरनिवड झाली आहे. त्यांना ५५.२ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ४४.८ टक्के मते मिळाली.

लेबर पार्टीचे ५१ वर्षीय खान हे लंडनचे पहिले मुस्लिम महापौर आहेत. खान यांना १२ लाख ६ हजार ३४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी हुजूर पक्षाचे शॉन बेलीयांना ९ लाख ७७ हजार ६०१ मते मिळाली.



सादिक खान हे पाकिस्तानी वंशाचे असून लेबर पार्टीचे खासदारही होते. २०१६ साली त्यांची लंडनच्या महापौरपदी पहिल्यांदा निवड झाली होती. महापौरपदाची निवडणूक गेल्या वर्षीच होणार होती. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे निवडणूक होऊ शकली नव्हती.

खान म्हणाले, लंडनवासियांनी जगातील अत्यंत महान शहराचे नेतृत्व पुन्हा करºयाची संधी मला दिली आहे. हा माझा गौरव समजतो. महामारीच्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्यासाठी काम करण्याचा विश्वास मतदारांनी मला दिला आहे.

२०१६ मध्ये खान यांच्या विजयामुळे आठ वर्षांनी ब्रिटनच्या राजधानीत लेबर पाटीर्चे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. त्याचबरोबर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदारांनी मुस्लिम उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी केले होते.

खान यांनी मानवाधिकार वकील म्हणून कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यानंतर ते खासदार बनले. २००५ पासून ते लेबर पाटीर्चे सात वेळा खासदार राहिले आहेत. गॉर्डन ब्राऊन पंतप्रधान असताना त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

Sadiq Khan, of Pakistani descent, re-elected as Mayor of London

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात