कोरोनावर उपाययोजनांपेक्षा ठाकरे सरकारचा पब्लिसिटी स्टंटच जास्त, प्रवीण दरेकर यांचा आरोप


कोरोनाच्या उपाययोजना करण्यापेक्षा ठाकरे सरकारचे पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष देत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईसह संपूर्ण राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वत:ची पाठ थोपटत बसले आहे. त्यापेक्षा कोरोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.Praveen Darekar alleges that Thackeray government’s publicity stunt is more than measures on Corona


विशेष प्रतिनिधी

मुंबई: कोरोनाच्या उपाययोजना करण्यापेक्षा ठाकरे सरकारचे पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष देत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईसह संपूर्ण राज्यातील

आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वत:ची पाठ थोपटत बसले आहे. त्यापेक्षा कोरोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.



दरेकर म्हणाले, कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयात कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुक वाटत नाही पण आमचे म्हणणे हेच आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

आजही रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन असलेले बेड मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाही. आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेत ज्या कमतरता आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे.

एखादी पीआर एजन्सी नेमून, बातम्या पेरुन आपले कोडकौतुक करायचे हे आता बास करा. लोकांना आता समजायला लागले आहे की, तुमच्या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत,असा आरोप करून दरकेर म्हणाले,

करोनाच्या उपाययोजना करण्याऐवजी यांचा जास्त वेळ पब्लिसिटी स्टंट करण्यात जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच आज इथली आरोग्यव्यवस्था टिकून आहे. पण हे केंद्रावर टीका करणे थांबवत नाहीत.

Praveen Darekar alleges that Thackeray government’s publicity stunt is more than measures on Corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात