पंजाबचे सरकार कॉँग्रेस नव्हे तर बादल कुटुंबच चालवित आहे, नवज्योतसिंग सिध्दू यांचा मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर हल्लाबोल


पंजाब कॉँग्रेसमधील धुसफूस सुरूच असून माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. सध्या पंजाबचे सरकार कॉँग्रेस नव्हे तर बादल कुटुंबच चालवित आहे. पक्षाच्या सगळ्या आमदारांकडून हिच भावना व्यक्त केली जात दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.The Punjab government is run not by the Congress but by the Badal family, said Navjot Singh Sidhu. Attack Amarinder Singh


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाब कॉँग्रेसमधील धुसफूस सुरूच असून माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ले सुरूच आहेत. सध्या पंजाबचे सरकार कॉँग्रेस नव्हे तर बादल कुटुंबच चालवित आहे. पक्षाच्या सगळ्या आमदारांकडून हिच भावना व्यक्त केली जात दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये २०१५ मध्ये झालेल्या कोटकपुरा पोलीस गोळीबाराची चौकशी करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर सिध्दू आक्रमक झाले आहेत. पंजाबमधील पूर्वीचे सरकार अकाली दल- भारतीय जनता पक्षाच्या युतीचे होते. प्रकाश सिंह बादल या सरकारचे मुख्यमंत्री होते. हा संदर्भ देऊन सिध्दू म्हणाले, पंजाबमधील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही अजूनही बादल यांच्या इशाऱ्यावरच काम करत आहे. कॉँग्रेस पक्षाच्या बुरख्याआडून बादलच सरकार चालवित आहेत. पक्षाचे सगळे आमदा आणि कार्यकर्त्यांची हिच भावना झाली आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांचे सरकार लोकांच्या कल्याणासाठी नव्हे तर माफियाराज कायम ठेवण्यासाठी काम करत आहे.फरिदकोट येथे २००५ साली झालेल्या गोळीबार प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचा अहवाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तेव्हापासूनच नवज्योतसिंग कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर टीका करत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग हे प्रशासन चालविण्यात सक्षम नसल्यानेच ही वेळ ओढवलीआहे. नव्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन या गोळीबार प्रकरणातील पीडितांना न्याय नाकारला जात आहे, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू हे पक्षशिस्तीचा भंग करत आहेत. कदाचित ते आम आदमी पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच ते कॉँग्रेसच्या सरकारवर टीका करत असावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

The Punjab government is run not by the Congress but by the Badal family, said Navjot Singh Sidhu. Attack Amarinder Singh

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण