पंजाबमध्ये महिलांना आता चक्क मोफत बसप्रवास, अमरिंदरसिंग सरकारची आणखी एक वचनपूर्ती

विशेष प्रतिनिधी

अमृतसर – पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राज्यभर महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देणाऱ्या योजनेला सुरुवात केली. राज्याच्या या निर्णयामुळे महिलांना पंजाब रस्तेमार्ग वाहतूक महामंडळ, पंजाब रस्तेमार्ग बस आणि शहरांमध्ये महापालिकांच्या बसमधून मोफत प्रवास करता येईल. Punjab Govt.fulfill its assurance

प्रत्यक्ष जाहीरनाम्यामध्ये महिलांना बस प्रवासासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कामध्ये पन्नास टक्के कपात करण्याचे आश्वाससन देण्यात आले होते. आता मात्र सरकारने महिलांसाठी सगळा प्रवास सरसकट मोफत केला आहे. खासगी बस चालकांनी देखील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत प्रवास भाड्यामध्ये कपात करावी, असे आवाहन कॅ.अमरिंदरसिंग यांनी केले आहे.आतापर्यंत राज्य सरकारने जनतेला दिलेली ८५ टक्के आश्वाेसने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली जवळपास सगळीच आश्वा्सने पूर्ण केली जातील, असेही त्यांनी नमूद केले.

Punjab Govt.fulfill its assurance

बातम्या…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*