Good news for Indian IT professionals, restrictions on H-1B visas ended by US President Joe Biden

भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी, H-1B Visa वरील निर्बंध संपुष्टात

H-1B visa : अमेरिकेतून भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी H-1B visaसमवेत परदेशी कामगारांना देण्यात आलेल्या व्हिसावरील बंदी संपुष्टात आणली. खरेतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 31 मार्चपर्यंत अशा व्हिसावर बंदी घातली होती, परंतु ही बंदी वाढवण्यासंबंधी कोणतीही अधिसूचना बायडेन सरकारने काढलेली नाही. Good news for Indian IT professionals, restrictions on H-1B visas ended by US President Joe Biden


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेतून भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी H-1B visa समवेत परदेशी कामगारांना देण्यात आलेल्या व्हिसावरील बंदी संपुष्टात आणली. खरेतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 31 मार्चपर्यंत अशा व्हिसावर बंदी घातली होती, परंतु ही बंदी वाढवण्यासंबंधी कोणतीही अधिसूचना बायडेन सरकारने काढलेली नाही.

आयटी व्यावसायिकांना दिलासा

बायडेन यांच्या या निर्णयामुळे हजारो भारतीय आयटी प्रोफेशनल्सना याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गतवर्षी कोविड-19 संकट आणि देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान H-1B visaसह अनेक तात्पुरत्या किंवा अप्रवासी-व्हिसा प्रवर्गातील अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता.

ट्रम्प यांनी बंदी आणली

ट्रम्प म्हणाले होते की, आर्थिक उलाढाली सुधारताना हे व्हिसा अमेरिकेच्या श्रम बाजारासाठी धोकादायक आहेत. नंतर त्यांनी ही सूचना 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली. ट्रम्प यांचे हे धोरण क्रूर असल्याचे सांगत बायडेन यांनी H-1B visaवरील निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.

H-1B visa का महत्त्वाचा?

एच-1बी व्हिसा एक परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठीचा व्हिसा आहे, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना विशिष्ट व्यवसायांसाठी परदेशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येते. अनेक क्षेत्रांत तांत्रिक तज्ज्ञांची गरज भासते. आयटी कंपन्या भारत आणि चीनसारख्या देशांकडून दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी या व्हिसावर अवलंबून असतात.

Good news for Indian IT professionals, restrictions on H-1B visas ended by US President Joe Biden

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*