…ते सध्या काय करतात! RBIचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किटांच्या ‘या’ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर

Former RBI Governor Urjit Patel Joins Britannia As Additional Director

Urjit Patel : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यावर एका भारतीय कंपनीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिस्किटे आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटानियाने ऊर्जित पटेल यांना कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले आहे. पुढील पाच वर्षे ते या पदावर कायम राहतील. Former RBI Governor Urjit Patel Joins Britannia As Additional Director


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यावर एका भारतीय कंपनीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिस्किटे आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटानियाने ऊर्जित पटेल यांना कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले आहे. पुढील पाच वर्षे ते या पदावर कायम राहतील.

‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटानियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 31 मार्च 2021 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत 31 मार्च 2021 ते 30 मार्च 2026 या कालावधीत ऊर्जित पटेल हे कंपनीचे अतिरिक्त संचालकपद स्वीकारतील, असा निर्णय घेण्यात आला. रघुराम राजन यांच्या राजीनाम्यानंतर एनडीए सरकारने ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते.

दोन वर्षे होते RBI गव्हर्नर

ऊर्जित पटेल यांनी 2016 ते 2018 दरम्यान दोन वर्षे आरबीआय गव्हर्नर पदाची जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर होते. ते सध्या राष्ट्रीय सार्वजनिक वित्त व धोरण संस्थेचे अध्यक्ष आहेत. याव्यतिरिक्त ते आर्मी ग्रुप विम्यासाठी गुंतवणूक सल्लागाराचीही जबाबदारी पार पडतात.

ऊर्जित पटेल यांना IMFचाही अनुभव

सरकारी जबाबदारी सांभाळण्यापूर्वी ऊर्जित पटेल यांनी सुमारे 15 वर्षे जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांसोबत काम केले आहे. पटेल यांनी आपल्या करिअरची सुरुवात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे (IMF) केली. याव्यतिरिक्त त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सल्लागार म्हणूनही काम पाहिलेले आहे.

Former RBI Governor Urjit Patel Joins Britannia As Additional Director

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात