हा माझी जबाबदारी म्हणणारे अजित पवार आता काय करणार? पंढरपूरच्या निवडणुकीने शिक्षकासह कुटुंब उध्वस्त


विशेष प्रतिनिधी

सांगोल : पंढरपूर विधानसभा पोटानिवडणुकीतील गर्दीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता याठिकाणी कोरोना वाढल्यास माझी जबाबदारी असे ते म्हणाले होते. याच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीने एका शिक्षकासह संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. What will Ajit Pawar do now? Pandharpur election devastates teachers family

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी सांगोल्यातील शिक्षक प्रमोद वसंतराव माने (वय 50) यांची ड्युटी लावली होती. यांची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून ड्युटी लावण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी 17 एप्रिल रोजी आसबेवाडी (ता. मंगळवेढा) याठिकाणी निवडणूक कर्मचारी म्हणून सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी सलग बारा तासांची ड्युटी निभावली होती. निवडणुकीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्व साहित्य पंढरपूर याठिकाणी जमा केलं आणि आपल्या घरी गेले.पंढरपूर पोटनिवडणूक आटोपून घरी परतलेल्या शिक्षकानं आपल्यासोबत कोरोना विषाणूही घरी नेला. घरी गेल्यानंतर दोन दिवसांत त्यांना विविध शारीरिक समस्या जाणवू लागल्या. निवडणुकीतील तणावामुळे होतं असेलं, असं त्यांना वाटलं. पण कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्या दोन दिवसांतच त्याचे संपूर्ण कुटुंबही कोरोनाच्या कचाट्यात सापडले.

घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांतचं शिक्षक प्रमोद माने यांच्यासह त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. पण प्रमोद माने यांना डायबेटिसचा त्रास असल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी आई आणि वडीलांनाही मुंबईत उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर मावशी जयश्री कोडग यांनाही मुंबईत दाखल करण्यात आले. या सर्वांवर मुंबईत उपचार सुरू असताना प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने यांचा 4 मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लागोपाठ मावशी जयश्री कोडग (वय 68) याचं 5 मे रोजी, वडील वसंतराव माने (वय 75) यांचं 6 मे रोजी तर प्रमोदची आई शशिकला माने (वय 70) यांचं 7 मे रोजी निधन झालं. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकामागून एक निधन झाल्यानं माने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत संपूर्ण राज्यातून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते येथे आले होते.स्वत: अजित पवार यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये कोरोना नियमावलीची ऐशीतैशी झाली होती. राज्यात सर्वत्र निर्बंध लावलेले असताना निवडणुकीमुळे पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यात मात्र सुट देण्यात आली होती. याबाबत पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांना विचारले असता पंढरपूर- मंगळवेढ्यात कोरोना वाढला तर आपली जबाबदारी असे ते म्हणाले होते.

What will Ajit Pawar do now? Pandharpur election devastates teachers family

महत्वाच्या  बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय