अफगाणिस्तानात सर्वत्र अनागोंदीचा कळस, एटीएममध्ये खडखडाट, लाखो लोकांसमोर अन्नाचे संकट


विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने स्वतःच्या हाती घेतली असली तरीसुद्धा आता त्यांच्यासमोर मोठी आर्थिक आणि लष्करी आव्हाने उभी ठाकली आहेत. दुसरीकडे तालिबानी राजवटीत सामान्य जनतेचे मात्र होरपळ होताना दिसते. देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला असून लाखो लोकांसमोर अन्नाचे संकट उभे ठाकले आहे.No money in ATM, food prices rises in Afghanistan

जीवनावश्यखक वस्तूंच्या किमती देखील वाढल्या आहेत.पंजशीर खोऱ्यातून तालिबान्यांच्या राजवटीला सशस्त्र विरोध होऊ लागला असून नॉर्दन अलायन्सच्या बॅनरखाली अनेक तालिबानविरोधी गट एकवटले आहेत. याच गटाने २००१ मध्ये अमेरिकेशी हातमिळवणी केली होती.



तालिबानने शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केली असली तरीसुद्धा सामान्य नागरिकांचा मात्र त्याला मोठा विरोध दिसतो. एक मोठा मानवी संघर्ष आपल्या डोळ्यासमोर होताना दिसतो आहे, असे अफगाणिस्तानातील जागतिक अन्न कार्यक्रमाच्या प्रमुख मेरी मॅकग्रोटरी यांनी सांगितले.

दरम्यान अफगाणिस्तानचा अमेरिकी बँकेतील तब्बल ९ अब्ज डॉलरचा निधी गोठविण्यात आला असून देशाच्या मध्यवर्ती बँकेला होणारा डॉलरचा पुरवठा ठप्प झाला आहे. देशात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला असून ४० टक्के पिके हातची गेल्याचे जाणकार सांगतात. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून करभरणा आणि किमतींबाबत त्यांच्या मनात कमालीचा संभ्रम असल्याचे दिसून येते.

No money in ATM, food prices rises in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात