जागतिक प्रतिकूल घडामोडीमुळे सेन्सेक्स ३०० अंशांनी गडगडला, बाजारात जोरदार झाली नफावसुली


विशेष प्रतिनिधी

मुंबई – जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये जोरदार नफावसुली झाली. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ३००.१७ अंशांनी, तर ‘निफ्टी’ ११८.३५ अंशांनी गडगडला. गेले काही दिवस जागतिक; तसेच भारतीय शेअर बाजार उच्चांकी पातळीवर होते.Sensex come down due to forginconditions

अमेरिकी डॉलर मजबूत झाल्यानेही आशियाई बाजारांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. जागतिक वायदे बाजारातील लोह खनिजाच्या भावात बदल झाल्याने धातू उद्योग कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले
अमेरिकी, युरोपीय व आशियाई बाजार पिछाडीवर असल्याने भारतीय शेअर बाजारही सकाळपासूनच घसरणीला लागले होते.



‘सेन्सेक्स’मधील प्रमुख ३० शेअरपैकी फक्त आठ शेअरचे भाव वाढले होते, तर उरलेल्या २२ शेअरचे भाव घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हर १३३ रुपयांनी वाढून २६१७ रुपयांवर, तर एशियन पेंटस १०९ रुपयांनी वधारून ३११२ रुपयांवर गेला. नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक, मारुती व आयटीसी यांच्या भावातही वाढ झाली.

चीनमध्ये आयटी व धातू उद्योगांवर लादलेली नियंत्रणे, चीनचा विकास कमी होण्याची शंका, अमेरिकी फेडरलने कोरोनाशी संबंधित पॅकेज कमी करण्याचे दिलेले संकेत, डेल्टा प्लसची वाढती रुग्णसंख्या, त्यातच अफगाणिस्तानमधील गोंधळ या कारणांमुळे जागतिक शेअर बाजारांमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

Sensex come down due to forginconditions

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात