ड्रॅगनला म्हातारपणाची चिंता : चीनमध्ये चाइल्ड पॉलिसीत मोठा बदल, आता ‘हम दो हमारे तीन’ धोरणाला मंजुरी

china approves 3 child policy encourage couples to have more children

china approves 3 child policy : चिनी सरकारने आपल्या चाइल्ड पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. पूर्वीच्या फक्त एक मूल जन्माला घालण्याच्या धोरणात बदल करत आता तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आता चीनमधील जोडप्यांना तीन मुले होऊ शकतील. एवढेच नाही तर या पॉलिसीमध्ये या जोडप्याला तीन मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. चीनमध्ये एक मूल धोरण बऱ्याच काळापासून लागू होते. यामुळे चीनची मोठी लोकसंख्या वृद्ध होत आहे. china approves 3 child policy encourage couples to have more children


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चिनी सरकारने आपल्या चाइल्ड पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. पूर्वीच्या फक्त एक मूल जन्माला घालण्याच्या धोरणात बदल करत आता तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आता चीनमधील जोडप्यांना तीन मुले होऊ शकतील. एवढेच नाही तर या पॉलिसीमध्ये या जोडप्याला तीन मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. चीनमध्ये एक मूल धोरण बऱ्याच काळापासून लागू होते. यामुळे चीनची मोठी लोकसंख्या वृद्ध होत आहे. 2016 मध्ये चीनने अनेक दशके जुने एक मूल धोरण रद्द केले आणि दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली होती. आता त्यात पुन्हा बदल करण्यात आला आहे.

या वर्षी मे महिन्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या दोन मूल धोरणात शिथिलता आणली आणि सर्व जोडप्यांना तीन मुले होण्यास परवानगी दिली. याला आता विधिमंडळाने मान्यताही दिली आहे. चीनची लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे आणि जन्मदर सतत कमी होत आहे, याचीच चिंता ड्रॅगनला भेडसावत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या राष्ट्रीय विधानसभेने शुक्रवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातर्फे देशातील वृद्ध लोकसंख्या आणि झपाट्याने कमी होणारा जन्मदर रोखण्यासाठी आणलेल्या तीन अपत्य धोरणाला मंजुरी दिली.

जास्त मुले जन्माला घालण्यासाठी आर्थिक मदत

नॅशनल पीपल्स कॉंग्रेस (NPC)च्या स्थायी समितीने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा पास केल्यामुळे या कायद्याने अधिक सामाजिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपायदेखील सादर केले. जेणेकरून ज्या जोडप्याला जास्त मुले असतील त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. नवीन कायद्यानुसार अधिक मुलांसह कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शिक्षण, घर आणि नोकरीमध्ये मदत दिली जाईल.

चीनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची लोकसंख्या 26.4 कोटी झाली आहे. पुढील पाच वर्षांत चीनच्या लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल. यामुळे देशात काम करणाऱ्यांची संख्या खूप कमी होईल आणि मोठे संकट निर्माण होईल. अशा परिस्थितीत चीन सरकार आता देशवासीयांना तीन मुले होऊ देण्याबाबत सांगत आहे.

china approves 3 child policy encourage couples to have more children

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*