“4” वगळून झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत पवारांचा केंद्रीय सहकार खात्यावर हल्लाबोल; सोनिया गांधींची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील सहकार खात्यावर हल्लाबोल केला. गृहमंत्री अमित शहा यांचे सहकार खाते राज्यातल्या सरकारांच्या अधिकारांवर अतिक्रमण करते आहे, असा आरोप त्यांनी केला. ही माहिती काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बैठकीत दिली. Meeting of Congress interim chief Sonia Gandhi with Opposition leaders, via video conferencing, begins.

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष, पंजाबमधील अकाली दल, मायावतींचा बहुजन समाज पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सहभागी झाले नव्हते. बाकीचे 18 पक्ष सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत निवडक नेत्यांची भाषणे झाली. त्यामध्ये शरद पवारांनी केंद्रीय सहकार खात्याकडून राज्याच्या अधिकार्‍यांवर होत असलेल्या अतिक्रमणबद्दल आवाज उठविला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार राज्य सरकार यांची करीत असलेल्या भेदभाव यावर आवाज उठविला, असे सोनिया गांधी यांनी आपल्या आढावा भाषणात सांगितले.

सोनियांनी सर्व विरोधी पक्षांना आपापले मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, आपले पक्ष जरी एकमेकांपासून भिन्न असले आणि काही राजकीय मर्यादा असल्या तरी आज ही नक्की वेळ आली आहे की आपण आपापसातले मतभेद आणि राजकीय मर्यादा विसरून एकत्र आले पाहिजे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत सध्याच्या केंद्र सरकारला समर्थ पर्याय उभा केला पाहिजे. सध्याचे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या कामात हस्तक्षेप करते. राज्यघटनेची पायमल्ली करून वेगवेगळ्या विषयांमध्ये घुसखोरी करते. हे ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी लक्षात आणून दिले आहे. गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचे सहकार खाते राज्याच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांवर कसे अतिक्रमण करते याचे वर्णन शरद पवारांनी केले आहे. या सर्व मुद्द्यांवर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पत्रे लिहिली परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मला मिळाला नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

देशातले शेतकरी अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका शरद पवार यांनी केली. केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेजारील देशांचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. परराष्ट्र धोरण फसले आहे, असे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले. ही माहिती सूत्रांनी दिली.

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला या बैठकीचे निमंत्रण होते. परंतु रामगोपाल यादव यांच्या घरी कुणाचे तरी निधन झाल्याने प्रतिनिधी या नात्याने ते सोनिया गांधींच्या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्ष आणि अकाली दल यांना निमंत्रण नव्हतेच. त्याच बरोबर बहुजन समाज पक्ष या बैठकीस उपस्थित राहणार नव्हताच त्यामुळे या तीन पक्षांसह समाजवादी पक्षाचा ही प्रतिनिधी नसल्यामुळे ऐक्याची बैठक “चार” वगळून झाली.

Meeting of Congress interim chief Sonia Gandhi with Opposition leaders, via video conferencing, begins.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात