मला मोजण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांचे आकलनच नाही, त्यांना काय उत्तर द्यायचे?; संभाजी ब्रिगेडला राज ठाकरेंचा टोला


विशेष प्रतिनिधी

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवादी विचार वाढविण्यात आला या आरोपाचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत केला. याच पत्रकार परिषदेत त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले. ज्यांचे मूळात आकलन नाही, त्यांना मी काय उत्तर द्यायचे? मला मोजण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आरोपांचा समाचार घेतला. Raj Thackeray target Sambhaji Brigade also in pune press conference

प्रवीण गायकवाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंना इतिहासाचे आकलन नसल्याची टीका केली होती. या टीकेला आता राज यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की मूळात ज्याचे काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचे? मी काय वाचतो आणि मी काय वाचलेय हे मला चांगले माहिती आहे. माझ्या पक्षाला आणि सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला मोजण्याचा प्रयत्न करू नये,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला.



राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातिवाद वाढल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की त्यांच्या राजकीय फायद्यासाठी ठरवून जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. मी त्यादिवशी म्हणालो होतो की आता कुठे आहे जेम्स लेन? नेमका तेव्हाच कसा तो आला आणि आग लावून निघून गेला? यामागे मोठे षडयंत्र आहे. ज्यांना जातिवादी राजकारण करायचे आहे त्यांचे एजंट असले जाती जातींमध्ये भांडणे लावण्याची कामे करत असतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

Raj Thackeray target Sambhaji Brigade also in pune press conference

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात