Maria Andrejczyk : पोलंडच्या ऑलिम्पिक खेळाडूने रौप्य पदकाचा केला लिलाव, मिळालेल्या पैशांतून आजारी मुलांवर शस्त्रक्रिया

Tokyo Medalist Maria Andrejczyk Auction Silver Medal For Infant Operation

Maria Andrejczyk : पोलंडच्या एका ऑलिम्पिक खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या तिच्या रौप्य पदकाचा लिलाव करून नवजात मुलाच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा केला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी हे पदक खरेदी केले त्यांनी हे पदक तिच्याकडे ठेवण्याची तयारी दर्शवली. Tokyo Medalist Maria Andrejczyk Auction Silver Medal For Infant Operation


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पोलंडच्या एका ऑलिम्पिक खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या तिच्या रौप्य पदकाचा लिलाव करून नवजात मुलाच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा केला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी हे पदक खरेदी केले त्यांनी हे पदक तिच्याकडे ठेवण्याची तयारी दर्शवली.

हाडांच्या कर्करोगातून सावरल्यानंतर यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 25 वर्षीय मारिया आंद्रेजिकने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मुलाला मदत करण्यासाठी तिने आपले पदक लिलावासाठी ठेवले. मिलोस मलिसा नावाच्या या नवजात मुलाचे अमेरिकेत ऑपरेशन होणार आहे. त्याचे कुटुंब यासाठी पैसे गोळा करत होते.

मिलोझच्या पालकांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर पोस्ट केले की, ऑपरेशन केले नाही तर मुलाच्या जिवाला धोका आहे. लोकप्रिय पोलिश स्टोअर जाबकाने 200,000 जलोटिस (51,000 डॉलर) ची बोली लावली, पण खेळाडूला सांगितले की ती आपले पदक जवळ ठेवू शकते. जाबकाने निवेदन दिले की, “आम्ही ऑलिम्पिक खेळाडूच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे प्रभावित झालो आहोत.” मारिया आंद्रेजिकच्या चाहत्यांनीही तिच्या मुलाला मदत करण्यासाठी तब्बल 76,500 डॉलर्सची रक्कम गोळा केली आहे.

Tokyo Medalist Maria Andrejczyk Auction Silver Medal For Infant Operation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात