विशेष प्रतिनिधी
बीजिंग – तिबेटी जनतेने बोलण्या-लिहिण्यासाठी प्रमाणित चिनी भाषेचा अवलंब करावा तसेच चीन या देशाच्या सांस्कृतिक प्रतिके, चिन्हे , चित्रांचा वापर करावा म्हणून सर्व पातळ्यांवर ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे, असे चीनने म्हटले आहे. China is very aggressive in terms of Tibet
तिबेटबाबत चिनी कम्युनिस्ट पक्षाने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. जाचक अशा धर्मगुरुसत्ताक राज्यपद्धतीपासून तिबेटी शेतकऱ्यांची आम्ही शांततेच्या मार्गाने मुक्तता केली. बाह्य शक्तींचा धोका असलेल्या या प्रांतात चीनने आपली सत्ता पुन्हा निर्माण केली,असा आक्रमक प्रचार चीनकडून केला जातो.
कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरो स्थायी समितीचे सदस्य वँग यांग म्हणाले, तिबेटने १९५१ पासून अंधारातून प्रकाशाकडे, मागासपणापासून प्रगतीकडे, गरीबीकडून भरभराटीकडे, विरोधाभासाकडून लोकशाहीकडे, संकुचितपणापासून खुलेपणाकडे वाटचाल केली आहे. दलाई लामा यांचा गट आणि शत्रुत्व करणाऱ्या बाह्य शक्तींच्या फुटीरतावादी आणि घातपाती कारयावांचा बीमोड करण्यात आला आहे.
गत वर्षी सुमारे १६० दशलक्ष पर्यटकांनी तिबेटला भेट दिली. कोरोना सुरु होण्यापूर्वीच चिनने परदेशी पर्यटकांच्या प्रवेशावर बंधने घातली होती. सीपीसीच्या नेतृत्वाचे पालन आणि समाजवादाच्या मार्गाची कास धरूनच तिबेट विकास आणि वैभव प्राप्त करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App