अफगाणिस्तानातील शेवट लाजीरवाणा, पहिल्या अमेरिकी हुतात्मा जवानाच्या वडिलांचा संताप


विशेष प्रतिनिधी

अलाबामा – अमेरिकेचे सैन्य माघारी परतत असताना अफगाणिस्तानमध्ये झालेला शेवट लाजीरवाणा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अफगाण मोहिमेतील अमेरिकेच्या पहिल्या हुतात्मा सैनिकाचे वडिल जॉनी स्पॅन यांनी व्यक्त केली आहे. End result in Afghanistan is very bad says USA old man

जॉनी म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिकेने गोंधळात माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची छायाचित्र बघताना मला खूप यातना होतात. तालिबानपासून बचावण्यास अधीर झालेल्या लोकांचे सैरावैरा धावणे, अमेरिकी लष्कराच्या झेपावणाऱ्या विमानाला लटकण्याचे त्यांचे प्रयत्न क्लेशदायक आहेत.

सैन्य काढून घेण्यास माझा विरोध नाही, मात्र त्यासाठीची वेळ आणि पद्धतीविषयी आक्षेप आहेत. आपण अफगाण जनतेला वचन दिले असताना त्यांची अशी अवस्था होणे कसे सहन होईल…त्यांनी मदत केली नसती तर अमेरिकेत आपण आपले आणखी किती जवान गमावले असते हे सांगता येणार नाही.जॉनी यांचा मुलगा माईक ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कवरील हल्ल्यानंतर लष्करात भरती झाला. काही दिवसांत त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठविण्यात आले. त्याचवर्षी २५ नोव्हेंबर रोजी उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील काला-ए-जांगी या किल्ल्यातील तुरुंगात तालिबानी कैद्यांच्या उद्रेकात तो मारला गेला. माईक ३२ वर्षांचा होता. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत मारल्या गेलेल्या अमेरिकेच्या २४४८ पहिला हुतात्मा म्हणून त्याची नोंद झाली आहे.

End result in Afghanistan is very bad says USA old man

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था