फरार मेहुल चोक्सी अँटीग्वातून गायब, क्युबात आश्रय घेतल्याची शक्यता


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – बँक गैरव्यवहारप्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी एटीग्वातून गायब झाला असून या ६२ वर्षीय उद्योपगतीने क्युबामध्ये आश्रय घेतल्याची शक्यता आहे. अँटीग्वाप्रमाणेच क्युबाशीही भारताचा कोणताही प्रत्यार्पण करार नाही. Mehul choksi will flee at cuba

चोक्सी हा जॉली हार्बरचा रहिवासी आहे. रविवारी जॉन्सन पॉइंट पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोधासाठी जनतेची मदत मागितली आहे. भारतीय वंशाचा, गव्हाळ रंगाचा, पाच फुट सहा इंच उंचीचा, जाड बांध्याचा आणि टक्कल असलेला असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.



रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास भोजनासाठी मोटारीतून एका हॉटेलकडे जाताना तो शेवटचा दिसला. हे हॉटेल बेटाच्या दक्षिण भागात आहे. त्याची मोटार ताब्यात घेण्यात आली आहे, पण त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

१४ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयला चोक्सी हवा आहे, मात्र २०१८ मध्ये त्याने अँटीग्वाला पलायन केले. त्यानंतर इंटरपोलमार्फत रेड नोटीस जाहीर करण्यात आली.

Mehul choksi will flee at cuba

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात