डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

Important steps taken by the Central Government to control the rising prices of pulses, instructions given to the states

rising prices of pulses : देशातील शेतकरी आता खरीप पिकांची पेरणीच्या कामात गुंतले आहेत. दरम्यान, देशातील डाळींचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही आवश्यक पावले उचलली आहेत. काही डाळींच्या आयातीत सूट दिल्यानंतर साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना गिरणी मालक, व्यापारी व इतरांनी केलेल्या साठ्यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 15 मे रोजी डाळींची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने मूग, उडीद व तूर आयात करण्यास मुभा दिली आहे. Important steps taken by the Central Government to control the rising prices of pulses, instructions given to the states


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील शेतकरी आता खरीप पिकांची पेरणीच्या कामात गुंतले आहेत. दरम्यान, देशातील डाळींचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही आवश्यक पावले उचलली आहेत. काही डाळींच्या आयातीत सूट दिल्यानंतर साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना गिरणी मालक, व्यापारी व इतरांनी केलेल्या साठ्यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 15 मे रोजी डाळींची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने मूग, उडीद व तूर आयात करण्यास मुभा दिली आहे.

गतवर्षी पिकांचे बरेच नुकसान झाले

गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये मूग आणि उडदाच्या शेतात नासाडी झाली होती. तर ऑक्टोबरनंतरच्या पावसाने कर्नाटक आणि महाराष्ट्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील, मध्य प्रदेशातील काही भागांत रबी हरभऱ्याचे प्रति एकरी उत्पादन कमी झाले आहे. यामुळे देशभरातील डाळींचे किरकोळ भाव वर्षभर उच्च स्तरावर राहिले. देशातील बर्‍याच शहरांमधील डाळींचे किरकोळ दर प्रति किलो 70 ते 120 रुपयांच्या दरम्यान आहेत.

केंद्र सरकारने बाजारात येत असलेल्या तुरीची आवक एक महिन्याने वाढवली होती. मेऐवजी मार्चच्या सुरुवातीला आयात कोट्याची घोषणा केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने आपल्या आयात नियमांमध्ये संशोधन करून सर्वांना लायसन्समुक्त आयातीची परवानगी दिली.

तूर डाळीची ठोक किंमत 3 रुपये किलोने घटली

या आठवड्यात तूर डाळीच्या घाऊक दरात घट झाली आहे. डाळींचे घाऊक दर प्रति किलो तीन रुपये कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात तूर डाळचा घाऊक दर 97 ते 99 रुपये प्रतिकिलोपर्यंत होता. या आठवड्यात 94 ते 96 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाला आहे.

Important steps taken by the Central Government to control the rising prices of pulses, instructions given to the states

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात