अफगाणिस्तान: भारतीय विमानाने 168 प्रवाशांना घेऊन काबूलमधून पुन्हा उड्डाण केले, आज हिंडन एअरबेसवर पोहोचेल


ताज्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे विमान C-17 ने आज सकाळीच काबूलहून उड्डाण केले आहे. यात 168 प्रवासी आहेत.Indian plane carrying 168 passengers resumes flight from Kabul, arrives at Hindon Airbase today


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये, भारत सरकार आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करत आहे. ताज्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे विमान C -17 ने आज सकाळीच काबूलहून उड्डाण केले आहे.  यात 168 प्रवासी आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की C-17 विमान काबूलहून भारतासाठी रवाना झाले आहे.  या विमानात 107 भारतीय नागरिक प्रवास करत आहेत.  त्यांनी सांगितले की, विमान आज सकाळी काबूलहून निघाले, जे आज गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचेल.

 एअर इंडिया विमानने केले उड्डाण

यापूर्वी काबूलहून एअर इंडियाचे विमानही आज सकाळी उड्डाण झाले आहे.  या विमानात 87 भारतीय होते.  त्यांना ताजिकिस्तानमार्गे दिल्लीला आणले जात आहे.  ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही ट्विट केली आहे.यात दोन नेपाळी नागरिकही आहेत.



 दोहा येथून 135 भारतीयांची तुकडी रवाना होईल

कतारमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये काबूलहून दोहा येथे आणलेल्या 135 भारतीयांची पहिली तुकडी भारतात परत पाठवली जात आहे. कतारमधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले की, काबूलहून नुकतेच दोहा येथे आणण्यात आलेल्या 135 भारतीयांची पहिली तुकडी आज रात्री भारतात परत पाठवली जात आहे.

दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे सुरक्षित परतावे सुनिश्चित करण्यासाठी कॉन्सुलर आणि लॉजिस्टिकल सपोर्ट दिला.

अफगाणिस्तानातून सुमारे 500 लोक आज भारतात परतणार

अफगाणिस्तानातून सुमारे 500 लोक रविवारी (आज )सकाळी इतर ठिकाणाहून विमानाने भारतात परत येतील. याआधी शनिवारी सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्यानंतर अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेने (नाटो) सैन्याने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कारवाया नियंत्रित केल्या आहेत.  त्यांच्याकडून एकूण 25 उड्डाणे चालवली जात आहेत, कारण ते सध्या त्यांचे नागरिक, शस्त्रे आणि उपकरणे बाहेर काढण्यावर केंद्रित आहेत.

Indian plane carrying 168 passengers resumes flight from Kabul, arrives at Hindon Airbase today

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात