Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास नागरिकांचे लसीकरण करण्याच्या आरोग्य विभागाच्या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून त्यांचे अभिनंदन केले. Record break corona vaccination of 11 lakh citizens in a day in the Maharashtra stateदिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता सिद्ध केले आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांतून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे.

पाच कोटींचा टप्पा आधीच पार

राज्याने लसीकरणाचा  पाच कोटींच्या डोसचा टप्पा ओलांडला होता. देशात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार जणांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर स्वातंत्र्या दिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन आधीचा विक्रम मोडला. शनिवारच्या लसीकरणानंतर हा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

Record break corona vaccination of 11 lakh citizens in a day in the Maharashtra state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर