भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल : वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास


विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन : कोरोना महामारीचा काळ सुरू झाला आणि आपल्या सर्वांचे आयुष्य बदलून गेले. बरेच उद्योगधंदे बंद करावे लागले, काही उद्योगधंदे बंद पडले, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणत्या ना कोणत्या कारणाने अशी बरीच उलथापालथ कोरोनामुळे झाली आहे. याचा प्रभाव भारताच्या इकॉनॉमीलाही साहजिकच भोगावा लागणार होता. पण वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी नुकताच एक सकारात्मक विधान भारता बद्दल केले आहे.

Indian economy is recovering : world bank president david malpass

त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची आर्थिक स्थिती कोरोना काळापेक्षा बरीच सुधारली आहे. त्याचप्रमाणे ते असे देखील म्हणाले की, भारता देशाला आर्थिक क्षेत्रामध्ये मुख्यत्वे उद्योगधंद्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा लॉस सहन करावा लागला होता. पण या सर्वांची नुकसानभरपाई म्हणून भारतात कोरोना व्हॅक्सिनचे प्रोडक्शन चालू होते. बऱ्याच देशांना भारताने व्हॅक्सिन देऊ केली होती. त्यामुळे यावर्षी भारत देशाच्या इकॉनॉमीमध्ये ८.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र, नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येत असल्याचा मूडीजचा अहवाल


आर्थिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक लोकांना एकत्र आणणे आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे अशी प्रचंड मोठी आव्हाने असतानाही भारतात आर्थिक क्षेत्रांमध्ये सुधारणा होत आहे. पण हे इतकेच पुरेसे नाहीये, असे देखील ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये बँकिंग प्रणाली, आर्थिक व्यवस्था, नागरी सेवा प्रणाली आणि स्वच्छ पाणी या सुविधा यादृष्टीने बरेच सकारात्मक बदल होत आहेत. पण कोरोनामुळे अख्ख्या जगामध्ये बऱयाच देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे एकूण पुरवठा साखळीमध्ये अनेक व्यत्यय येत आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण जगभरात वाढलेल्या महागाईमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला देखील फटका बसलाच आहे असे देखील डेव्हिड मालपस ह्यावेळी म्हणाले आहेत.

Indian economy is recovering : world bank president david malpass

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर