भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र, नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येत असल्याचा मूडीजचा अहवाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेतील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येत आहे. त्यामुळे आशादायी चित्र निर्माण झाल्याचे मूडीज या रेटींग एजन्सीने म्हटले आहे.
रेटिंग एजन्सी मूडीजने मंगळवारी भारताचा आर्थिक दृष्टिकोन नकारात्मकवरून स्थिर केला.Moody’s reports optimistic picture of Indian economy

मूडीजचे हे रेटिंग अर्थव्यवस्थेतील मंदीचा कमी धोका आणि पुनर्प्राप्तीसाठी एक चांगला व सकारात्मक दृष्टिकोन दर्शविते. भारताला दिलेले बीएएए 3 चे आधीचे रेटिंग मूडीजने कायम ठेवले आहे.



भारताचा अर्थव्यवस्थेविषयीचा दृष्टिकोन नकारात्मक वरून स्थिरमध्ये बदलण्यात आला आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे. त्याचबरोबर देशातील परदेशी आणि स्थानिक चलनाचे दीर्घकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्थेवरील धोके कमी झाले आहेत, असे देशाच्या रेटिंगमध्ये झालेला बदल सूचित करतो.

मूडीजने गेल्या वर्षी भारताचे क्रेडीट रेटिंग बीएए-2 वरून बीएए-3 केले होते. नंतर कोरोना महामारीमुळे आर्थिक वाढीच्या दरात तीव्र घट झाली आणि सरकारची तूट वाढत होती. म्हणूनच मूडीजने रेटिंगचा दृष्टिकोन नकारात्मक ठेवला होता, जो आता स्थिर झाला आहे.

Moody’s reports optimistic picture of Indian economy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात