जगातली पहिल्या महामारी प्रूफ इमारतीची निर्मिती सुरू, तब्बल 500 मिलियन डॉलर खर्चून बांधली जातेय 55 मजली इमारत

Worlds first pandemic proof building is being built in USA know features and specialty

Worlds first pandemic proof building : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे जगभरातील देशांचे खूप नुकसान झाले. अमेरिका, भारत, ब्रिटनसारखे मजबूत देश असो किंवा बांगलादेश, ब्राझीलसारखे देश असो… कोरोनाने कोणालाही सोडले नाही. जगभरातील देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक जण या साथीमुळे प्रभावित झाला आहे. कोरोनापूर्वी स्पॅनिश फ्लूनेही कहर केला होता. Worlds first pandemic proof building is being built in USA know features and specialty


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे जगभरातील देशांचे खूप नुकसान झाले. अमेरिका, भारत, ब्रिटनसारखे मजबूत देश असो किंवा बांगलादेश, ब्राझीलसारखे देश असो… कोरोनाने कोणालाही सोडले नाही. जगभरातील देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक जण या साथीमुळे प्रभावित झाला आहे. कोरोनापूर्वी स्पॅनिश फ्लूनेही कहर केला होता.

शास्त्रज्ञांनी अशा महामारी टाळण्यासाठी जवळजवळ सर्व प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचे फळ म्हणजे आज साथीच्या औषधांपासून ते लसीपर्यंत विविध उपाय उपलब्ध आहे. पण साथीचे रोग टाळण्यासाठी इतर उपाय करता आले असते का? अशी जागा तयार केली जाऊ शकते का जिथे महामारीच येऊ शकणार नाही? अशी इमारत जेथील रहिवासी साथीच्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतील!

अमेरिकेच्या या शहरात प्रयत्न सुरू आहेत

महामारीपासून दूर राहण्यासाठी, फ्लोरिडा, यूएसएमधील बांधकाम व्यावसायिकांनी जगातील पहिल्या महामारी रोधी गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे, येथे महामारीचा परिणाम जाणवणार नसल्याचा दावा केला जात आहे. फ्लोरिडामध्ये बांधल्या जाणाऱ्या या लेगसी टॉवरमधील रहिवाशांना भविष्यातील साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी सर्व उपाय केले जात आहेत. यात जिवाणू मारणारे रोबोट्स, टचलेस टेक्नॉलॉजी आणि आधुनिक वायू शुद्धीकरण प्रणाली असतील.

500 मिलियन डॉलरच्या खर्चाने 55 मजली इमारत

ही इमारत 55 मजल्यांची असेल. त्याच्या बांधकामासाठी 500 मिलियन डॉलर म्हणजेच 37,72,27,75,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये बांधलेली हॉटेल्स आणि घरे ही महामारी लक्षात घेऊन बांधली जातील. लोकांसाठी अशा सर्व सुविधा असतील, जेणेकरून त्यांना दैनंदिन गरज किंवा इतर कोणत्याही अडचणींमध्ये कुठेही बाहेर जावे लागणार नाही. अशा प्रकारे लोकांचा वेळ वाया जाणार नाही. इमारतीमध्ये सर्व सुविधा वेळेवर उपलब्ध होतील, असा दावा केला जात आहे.

इमारतीत हॉटेल आणि हॉस्पिटलसुद्धा

या गगनचुंबी इमारतीमध्ये हॉटेल्स आणि रुग्णालयेदेखील बांधली जातील, ज्यामुळे लोक महामारीपासून सुरक्षित राहतील. साथीपासून बचाव करण्यासाठी सर्व सुविधा या इमारतीत असतील. साफसफाईसाठी, येथे असे रोबोट वापरले जातील जे धोकादायक जिवाणू-विषाणूंचा नाश करतील. हे रोबो इमारतीला बॅक्टेरियामुक्त ठेवतील.

Worlds first pandemic proof building is being built in USA know features and specialty

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात