कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात


कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळणे अवघड झाले आहे.Deployed troops to prevent corona in Canada


विशेष प्रतिनिधी

ओटावा : कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळणे अवघड झाले आहे.

कॅनडामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आटॅरिओ या प्रदेशात कोराना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी हवाई दलाच्या मदतीने विमानातून वैद्यकीय कर्मचारी आणि साहित्य पाठविले जात आहे.



अटलांटिक या राज्यातून हे मनुष्यबपळ पाठविले जात आहे, असे कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कॅनडाच्या सार्वजनिक सेवा विभागाचे मंत्री बिल ब्लेअर यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून ओटॅरिओ राज्याला सर्व प्रकारची मदत केली जात आहे.

आटॅरिओ येथे ८७७ कोरोना रुग्ण हे सध्या आयसीयूमध्ये आहेत. मे महिन्यापर्यंत ही संख्या १५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अल्बर्टा या राज्यात कोरोना वाढीचा वेग सर्वाधिक आहे.

त्यामुळे याठिकाणी मांस पॅकींगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे कोरोना वाढला असे म्हटले जात आहे.

Deployed troops to prevent corona in Canada

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात