अमेरिकेतील संपन्न जीवनाच्या आशेने चाललेल्या भारतीय कुटुंबाचा गोठून मृत्यू, मानवी तस्करी रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे आश्वासन


विशेष प्रतिनिधी

ओटावा : संपन्न जीवनाच्या आशेने कॅनडातून तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत चाललेल्या भारतीय कुटुंबाचा गोठून करुण मृत्यू झाला. अमेरिकेत होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शुक्रवारी सांगितले.Canadian PM pledges to do everything possible to curb human trafficking, The death of an Indian family going to Amerika in the hope of a prosperous life

मिनेसोटाच्या सीमेच्या उत्तरेस काही यार्डांवर असलेल्या मॅनिटोबा प्रांतात चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष, स्त्री, बाळ आणि बालकाचा समावेश आहे. हे एक भारतीय कुटुंब असून संपन्न जीवनाच्या आशेने ते कॅनडातून अमेरिकेत चालले हहोते. कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करताना ही घटना घडल्याचा संशय आहे.



ही घटना ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की कॅनडा-अमेरिका सीमेवर एका चिमुरड्यासह ४ भारतीयांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी अमेरिका आणि कॅनडातील भारतीय राजदुतांना तात्काळ या परिस्थितीवर हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत.

अमेरिकेच्या लगत असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या एका अपघातात एकाच परिवारातल्या चार सदस्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. हे चौघेही भारतीय नागरिक आहेत. मृतांमध्ये एका नवजात शिशूचाही समावेश आहे.

मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाजवळ बुधवारी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक नवजात शिशूचा आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. प्राथमिक तपासानुसार या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झालेला आहे.

पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे.

एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही. यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

Canadian PM pledges to do everything possible to curb human trafficking, The death of an Indian family going to Amerika in the hope of a prosperous life

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात