मुलींच्या लग्नाचे वय वाढणार असल्याने घबराट, मध्य प्रदेशात मुस्लिमांमध्ये निकाहच्या प्रमाणात ७०० टक्के वाढ


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : बेटी बचाव-बेटी पढाव कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मोदी सरकार मुलींच्या लग्नाचे कायदेशिर वय १८ वरून वाढवून २१ करणार आहे. मात्र, यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड घबराट पसरली आहे. मध्य प्रदेशात मुस्लिम मुलींच्या निकाहाच्या प्रमाणात ७०० टक्यांनी म्हणजे सरासरीपेक्षा सात पट वाढ झाली आहे.In Madhya Pradesh, the number of marriages among Muslims has increased by 700 per cent.

मध्य प्रदेशातील भोपाळ, ग्वालेहर यासारख्या १० शहरांमध्ये निकाहांचे प्रमाण ४२ टक्यांहून ७०० टक्यांवर गेले आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मशीदींमध्ये नोंदल्या गेलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.



भोपाळच्या मशीद समितीचे सचिव यासिर अराफत यांनी सांगितले की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाहासाठी एक हजार अर्ज आले आहेत. यातील बहुतांश अर्जांमध्ये निकाहाची तारीख लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. भोपाळमध्ये या काळात ८५० निकाह झाले आहेत.

ही संख्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारकडून आता मुलींच्या लग्नाचे अधिकृत वय २१ वर्षे केले जाणार हे आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले जाण्याची भीती असल्यानेही निकाहांचे प्रमाण वाढत आहे.

जिंसी येथील रियाझ कुरैशीची यांचा निकाह काही वर्षांनंतर होणार होता. मात्र, मुलींच्या लग्नाचे अधिकृत वय २१ होणार असल्याने लवकर निकाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
भोपाळमधील जावेद यांच्या मुलीचे लग्न मे २०२२ मध्ये होणार होतो. मात्र, नवीन कायद्याच्या भीतीने सहा महिन्यांपूर्वीच निकाह लावण्यात आला. जावेद यांच्या म्हणण्यानुसार आता मुलीचे वय १९ आहे. त्यामुळे २०२२ मध्ये लग्न करणे शक्य होणार नाही.

सूफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हाफिज मोहम्मद दानिश यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी यांनी निकाहाचे वय वाढविण्याचा निर्णय घेतल्याने आता होणाऱ्या निकाहांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊनची भीती हे देखील त्यामागील एक कारण आहे.

In Madhya Pradesh, the number of marriages among Muslims has increased by 700 per cent.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात