सिद्धूंचे सल्लागार पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफांची हिंदूंना धमकी; व्हिडिओ व्हायरल!!


प्रतिनिधी

चंडीगड : पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा यांनी हिंदूंना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Navjot Singh Sidhu communalises elections why Congress and Sidhu are dangerous for Punjab.

मोहम्मद मुस्तफा आहे पंजाबचे पोलीस महासंचालक तर होतेच याखेरीज ते पंजाबच्या विद्यमान मंत्री आणि मलेरकोटला विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसचे उमेदवार रजिया सुलतान यांचे पती आहेत. मोहम्मद मुस्तफा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्यांनी हिंदू समाजाला धमकी दिली आहे.

मोहम्मद मुस्तफा म्हणतात, की मी कौमी फौजदार आहे. मी मतांसाठी लढत नसून माझ्या कौमसाठी लढतोय. मी पंजाब सरकारला इशारा देतो, की माझ्याबरोबर हिंदूंना जलसा करण्याची परवानगी दिली तर याद राखा मी असे वातावरण निर्माण करीन की सरकारला सांभाळणे मुश्कील होईल, अशी धमकी मोहम्मद मुस्तफा यांनी दिली आहे.

मोहम्मद मुस्तफा यांच्या या धमकीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पंजाब मध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठा तणाव उत्पन्न झाला आहे. अकाली दल, भाजप, आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांनी मोहम्मद मुस्तफा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे करण्याची मागणी पंजाब सरकारकडे केली आहे. पंजाबच्या पोलीस महासंचालक पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशी जातीय हिंसाचाराची धमकी द्यावी आणि ती काँग्रेस सरकारने ऐकून घ्यावी, याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. येत्या 24 तासात मोहम्मद मुस्तफा यांच्यावर कारवाई झाली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा देखील भाजप आणि अकाली दल यांनी दिला आहे.

Navjot Singh Sidhu communalises elections why Congress and Sidhu are dangerous for Punjab.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था