चीनी लसींवर विसंबले ते पस्तावले, लस संपूर्ण निष्प्रभ ठरल्याने चार देशांत कोरोनाचा कहर, ९० देशांत धास्ती


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : चीनी लसीवर विसंबून लसीकरण करणाऱ्या देशांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. मंगोलिया, बहारीन, चिली आणि सेशेल्स या देशांनी चीनी लसीचा वापर केला. आपल्या देशांत लसीकरण मोहीम राबविली. मात्र, ही चीनी लस पूर्णपणे निष्प्रभ ठरली असून आता या देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.They regretted relying on Chinese vaccines, Corona outbreak in four countries, scare in 90 countries

या देशांमध्ये कोरोनाचे पुन्हा संक्रमण झाल्याने देशांत हाहाकार माजला आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित दहा देशांमध्येही त्यांचा समावेश आहे. केवळ हे चारच देश नाही जगातील आणखी किमान ९० देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. लस घेऊनही तिथलं कोरोना संक्रमण वाढत आहे.



ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते लोकही आजारी पडत आहेत. त्यांच्याकडूनही कोरोनाचा प्रसार वाढला असून या देशांवर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव चीनपासून सुरू झाला. चीनने सर्वात पहिल्यांदा कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला होता.

त्याप्रमाणे लस तयारही केली गेली. मात्र, चीनच्या पोलादी पडद्यामागे लसीकरणाच्या चाचण्यांचा डाटा देण्यात आला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही या लसींना मान्यता दिलेली नाही. मात्र, चीनने व्हॅक्सिन डिप्लोमसी मोहीम सुरू करतअनेक देशांना आपली लस दिली. कोरोना प्रतिबंधासाठी ही लस अतिशय उपयुक्त, प्रभावी आणि सुरक्षित आहे, असे आश्वासनही दिले.

कोरोनावर त्या वेळी लस उपलब्ध नसताना आणि लसीचा प्रभावीपणाही माहीत नसताना अनेक देशांनी आपत्कालीन स्थिती म्हणून चीनच्या या लसीला मान्यता दिली. पण हे सगळेच देश आता पश्चाताप करत आहे. जगभरात आता अनेक लसी तयार झाल्या असताना आणि त्यांची उपयुक्तताही सिद्ध होत आहे.

मात्र, चीनी लस घेतलेल्या देशांपुढे आता चिंता निर्माण झाली आहे. अनेक देशांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. चीनी लसींचा आम्हाला काहीही उपयोग झाला नाही, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसाठी तर त्या पार कुचकामी ठरल्या, अशी या देशांची तक्रार आहे.

कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही कोणती लस वापरता, याला आता जगभरात महत्त्व आलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेण्यात अमेरिकेला मागे टाकताना सेशेल्स, चिली, बहारीन आणि मंगोलिया या देशांनी ५० ते ६८ टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण केलं होतं. लवकरच संपूर्ण देशाचं लसीकरण पूर्ण करण्याचं त्यांचं ध्येय होतं.

पण, लसींचे दोन्ही डोस घेऊनही तिथलं कोरोना संक्रमण वाढतच असल्याचं पाहून हे देश हादरले आहेत. बहुसंख्य लोकांनी सिनोफार्म आणि सिनोवॅक बायोटेक या चिनी कंपन्यांची लस घेतली होती.युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे विषाणूतज्ज्ञ जीन डोंगयान यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे, या चिनी लसी जर खरोखरच उपयुक्त असत्या तर असं घडलं नसतं.

यावर उपाय शोधताना त्याची जबाबदारीही चीननं घेतली पाहिजे. लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनही या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक का वाढतोय, याबद्दल संशोधकही सचिंत आहेत.लसींचे दोन्ही डोस घेतल्यामुळे आपल्याला आता काही होणार नाही, कोरोनाचा धोका टळला,

या विश्वासामुळेच त्या त्या सरकारांनी आणि लोकांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, हात धुणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तातडीनं दैनंदिन व्यवहार सुरू केले. त्यामुळेही तिथे कोरोनाचा उद्रेक वाढला, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण, त्याचे दूरगामी परिणाम आता या देशांना भोगावे लागतील.

लोकांचं नव्यानं टेस्टिंग करावं लागेल, लॉकडाऊन वाढवावं लागेल, अर्थव्यवस्था पुन्हा खालावेल, लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर बंधनं येतील. येते काही महिने किंवा काही वर्षही लोकांना त्याचा त्रास सोसावा लागेल.

They regretted relying on Chinese vaccines, Corona outbreak in four countries, scare in 90 countries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात