PM Netanyahu : IDFने हानियाला ठार केल्यानंतर हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा, पंतप्रधान नेतन्याहूंची इराणला धमकी

PM Netanyahu

वृत्तसंस्था

तेल अवीव : इस्रायल ( Isreal ) आणि इराणमधील (  Iran ) संभाव्य युद्धादरम्यान IDF गाझामध्ये सतत ऑपरेशन करत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाचे जवान आणि हवाई दल जबरदस्त हल्ले करत आहेत. दरम्यान, सोमवारी इस्रायली लष्कराने हानियानंतर हमासचा मजबूत आधारस्तंभ अबेद अल-जेरी याला ठार केले. गाझामधील सामान्य लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचण्यात आबेद हा सर्वात मोठा अडथळा होता.

IDF ने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अबेद या प्रमुख हमास दहशतवाद्याला ठार केले आहे, ज्याने गाझामधील नागरिकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचू नये यासाठी काम केले होते. त्यांनी हमासच्या लष्करी शाखेच्या उत्पादन विभागात काम केले आणि अर्थमंत्रीही होते. एवढेच नाही तर तो हमासच्या नियंत्रणाखालील बाजारपेठा सांभाळून माल पुरवायचा.



रविवारी इस्रायली लष्कराने पुन्हा दोन शाळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर जखमी झाले आहेत. हा हल्ला एवढा शक्तिशाली होता की शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बचाव कर्मचाऱ्यांनी शाळेतून 25 मृतदेह बाहेर काढले, तर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या शाळांमध्ये विस्थापित पॅलेस्टिनी राहत होते.

गाझा शहरातील दोन शाळांमध्ये असलेल्या लष्करी संकुलावरही हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने मान्य केले आहे. शनिवारीदेखील इस्रायलने उत्तर गाझा येथील शेख रदवान येथील हमामा शाळेवर हल्ला केला, ज्यात 16 लोक ठार झाले तर 21 जखमी झाले. एवढेच नाही तर रविवारी पहाटे इस्रायलने देर अल-बालाह येथील तंबू तळाला लक्ष्य केले होते, ज्यामध्ये चार लोक मारले गेले होते.

दुसरीकडे, गाझामधील युद्धबंदीच्या प्रयत्नांना फटका बसत असताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना कडक इशारा दिला आहे. जेरुसलेममध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की जर कोणी इस्रायलला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ‘खूप मोठी किंमत’ चुकवावी लागेल. ते कोणत्याही देशापुढे लाचार नाहीत.

नेतन्याहू म्हणाले की, इराणला इस्रायलला 7 आघाड्यांवर घेरायचे आहे. ते म्हणाले, “इराण आणि त्याच्या समर्थकांना आम्हाला सात आघाड्यांवर दहशतीने घेरायचे आहे. त्यांची आक्रमकता दिसत आहे, पण इस्रायलही लाचार नाही. आम्ही त्यांच्या विरोधात प्रत्येक आघाडीवर, प्रत्येक क्षेत्रात उभे आहोत. जो कोणी आमच्या नागरिकांना मारेल त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.”

PM Netanyahu Hamas Commander After Haniya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात