विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी येत्या सप्टेंबर-डिसेंबर या काळात कोरोनापासून बचाव करणारी गोळी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.Mediciene will avalable till this dec.
या गोळीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही आणि घरातच राहून गोळीचे सेवन करावे लागेल. ॲटीव्हायरल टास्क फोर्सकडून गोळी विकसित होत असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
जगभर सध्या थेमान घालत असलेल्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे रोज हजारो जणांचे बळी जात आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष लस व औषधाकडे लागले आहे.
गेली वर्षभर जगभरातील सारे संशोधक झाडून लस व औषधनिर्मितीचे प्रयत्न करीत आहेत. त्यात लशीची निर्मीती करण्यात आता यश आले आहे. मात्र लस घेतला तरी कोरोना होतच नाही याबाबत शाश्वती नाही. आता औषध आले तर अब्जावधी नागरिकांचे जीवन सुखकर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App