विशेष प्रतिनिधी
लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रभाव वाढत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यात वर्तविली जावू लागली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून दर ११ दिवसांनी संसर्गग्रस्तांची संख्या दुप्पट होत आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.Briton going towords third wave
दर ६७० जणांमागे एकाला विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. हे प्रमाण ११ दिवसांनी दुप्पट होत असल्याचे दिसून आले आहे. भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा विषाणूप्रकाराचा प्रभाव वाढत असल्याचे हे निदर्शक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा पुनर्निमाणाचा दर १.४४ इतका आहे. म्हणजेच १० बाधित व्यक्ती इतर १४ जणांच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात. बाधितांमध्ये लहान मुले आणि युवकांचे प्रमाण अधिक असले तरी ज्येष्ठांनाही बाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App