महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सहा लाखांपर्यंत पोहोचण्याची तज्ञांची भिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्णसंख्या परत दुपटीने वाढू शकते.Health Dept. warns for third wave

पहिल्या लाटेत १९ लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाखांहून जास्त झाली होती. उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठ लाख होऊ शकते; तसेच १० टक्क्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने सादरीकरणात नमूद केले आहे.अर्थात हे भाकीत खोटे ठरवण्यासाठी काळजी घेण्याचे सर्वांपुढे आव्हान आहे. राज्यात सध्या कोरोनाची साथ कमी झाल्याने निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीपासून ते कामासाठी लोकांची बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तज्ञांनी सरकारला सादर केलेल्या अहवालाचा महत्व आहे.

वेगाने लसीकरण करणे त्याचप्रमाणे कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करणे हे फार महत्वाचे राहणार आहे. लसीकरणात सध्या तरी महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. हाच वेग कायम ठेवावा लागणार आहे.

Health Dept. warns for third wave

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती