घाबरू नका ! करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर परिणाम होण्याचे संकेत नाहीत ; डॉ. रणदीप गुलेरिया


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका यिवर AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची  महत्वाची माहिती.तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची लागण होईल असं वाटत नाही. 


करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या जिवाला अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत होतं. हे दावे कुठल्याही तथ्यांवर आधारीत नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. “No Evidence” COVID-19 Will Impact Children More In 3rd Wave: AIIMS Chief


वृत्तसंस्था

नवी दिल्लीः करोना दुसरी लाट आता हळहळू ओसरत आहे. अशातच आता दिलासा देणारी एक बातमी आली आहे. तज्ज्ञांनी येणाऱ्या काळात भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला . या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊन त्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल अशा बातम्याही गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत .परंतू AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.”No Evidence” COVID-19 Will Impact Children More In 3rd Wave: AIIMS Chief

करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर गंभीर परिणाम होतील असे कुठलेही संकेत नाहीत, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हटलं आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक संसर्ग होऊ शकतो, असं आधी सांगण्यात येत होतं.

देशातील करोनाच्या स्थितीवर सोमवारी आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली. यात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फार कमी मुलांना संसर्ग झाल्याचं आपल्याला दिसून आलं. यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये सर्वाधिक संसर्ग दिसून येईल, असं वाटत नाही. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असं सांगण्यात येतंय. पण हे तथ्यांवर आधारीत नसल्याचं पेडियाट्रिक्स असोसिएशनचं म्हणणं आहे. संसर्गाचा परिणाम मुलांवर होणार नाही यासाठी नागरिकांनी घाबरू नये, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.

 

आतापर्यंत आमच्याकडे जी आकडेवारी आली आहे त्यावरुन तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा जास्त धोका आहे असं वाटत नाही. जी लोकं ही थेअरी मांडत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत मुलांना या विषाणूचा फारसा त्रास झाला नाही म्हणून तिसऱ्या लाटेत मुलांना याचा धोका असू शकतो. परंतू अद्याप अशी आकडेवारी किंवा पुरावे समोर आलेले नाहीत

“No Evidence” COVID-19 Will Impact Children More In 3rd Wave: AIIMS Chief

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात