पंजाबात अमरिंद सिंगांचा काँग्रेसमधील असंतोषाविरोधात तोडगा; आम आदमी पक्ष फोडून काँग्रेसला जोडला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंद सिंग यांच्या विरोधात थोडे थोडके नाहीत, तर २० – २५ आमदार असंतुष्ट आहेत. त्यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. पण अमरिंद सिंग त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यापेक्षा काँग्रेसबाह्य पक्षांना फोडून काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मागे लागले आहेत. आपली राजकीय ताकद ते दुसऱ्या पक्षांच्या आमदारांना काँग्रेसमध्ये घेऊन भरून काढत आहेत. Punjab CM Amrinder singh breaks AAP; 3 MLAs joined congress

नवज्योज सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पंजाब काँग्रेसचे २० – २५ आमदार काँग्रेस हायकमांडला भेटले आहेत. सिध्दूची पोस्टर्स देखील पंजाबमध्ये लागली आहेत. त्यावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांचा फोटो नाही. खासदार पी. एस. बाजवा यांनी देखील अमरिंदर सिंगाविरोधात स्पष्ट शब्दांमध्ये रोष व्यक्त केला आहे.

तरीही अमरिंदर सिंग बधलेले नाहीत. त्यांनी असंतुंष्टांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी आम आदमी पक्ष फोडण्याकडे लक्ष दिले आहे. आधी त्यांनी आम आदमी पक्षाचे २ आमदार फोडले. आता त्याच पक्षाचे आणखी ३ आमदार सुखपाल सिंग खैरा, जगदेव सिंग कामलू, आणि परिमल सिंग खालसा यांना फोडून काँग्रेसमध्ये घेतले आहे. या तिघांनी पंजाबचा आम आदमी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्याचे जाहीर केले आहे.

आम आदमी पक्ष वन मॅन शो आहे. ते आम्हाला विचारत नाहीत. २०१५ मध्ये त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही चूक केली. आता पुन्हा आम्ही काँग्रेसमध्ये येत आहोत, असे सुखपाल सिंग खैरा यांनी सांगितले. काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीष रावत आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या समवेत पंजाबच्या तीनही आमदारांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींची भेट घेऊन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले.

Punjab CM Amrinder singh breaks AAP; 3 MLAs joined congress

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था