मंत्र्यांनी निर्णय घ्यावेत, आंदोलनाची गरज काय?, ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे पुढे सरसावल्या; २६ जूनला चक्काजाम आंदोलन


प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रातले ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यावर त्यावरून देखील राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे या मुद्द्यावर आंदोलनाची भाषा करीत असताना भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे या देखील आंदोलनासाठी पुढे आल्या आहेत. २६ जूनला ठाकरे – पवार सरकारविरोधात चक्काजाम आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. BJP leader pankaja munde announced chakka jam agitation on 26 june for OBC political reservation

मुंबईत पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणाल्या, की कोरोना परस्थिती आणि इम्पिरिकल  डाटा गोळा करण्याचा एकमेकांशी संबंध लावणे चुकीचे आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज काय?, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी २६ जून रोजी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की ओबीसींचे राजकीय आरक्षण हा काही फक्त भाजपाचा विषय नाही. सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांचा हा विषय आहे. आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. आज भाजपने घेतलेल्या बैठकीत असा निर्णय झाला आहे की, २६ जून रोजी आम्ही चक्का जाम करणार आहोत. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या बैठकीबद्दल नुसती चर्चा करण्यात अर्थ नाही.



कोरोनामुळे इम्पिरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, हे विधान मला मान्य नाही. कोरोना असतानाही राज्यात अनेक गोष्टी सुरू आहेत. करोनाची बंधने पाळून अनेक गोष्टी करता येतील. बाकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, तेच इम्पिरिकल डाटाच्या बाबतीत का नाही करू शकत? त्यामुळे दोन्हींचा संबंध लावणे योग्य नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की मुख्यमंत्र्यांना कोणी गाफील ठेवत असेल, तर राज्याच्या दृष्टीने ही काही चांगली गोष्ट नाही. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही वेळ मागितली आहे. त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय होते ते बघू, असेही त्यांनी सूचित केले.

राज्यातल्या मंत्र्यांना भरपूर अधिकार असतात. सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना आमच्याकडे निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आम्ही हे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पावले टाकली. अध्यादेश काढले. पण ठाकरे – पवार सरकारची मानसिकता तशी नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टात आरक्षण टिकले नाही, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.

BJP leader pankaja munde announced chakka jam agitation on 26 june for OBC political reservation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात