विशेष प्रतिनिधी
बांग्लादेश : बांग्लादेशमधील कॉक्स बाजार हा जगातील एक लांब पट्टीचा नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. बांगलादेश मध्ये हा समुद्रकिनारा लोकप्रिय आहेच तर जगभरात देखील हा समुद्रकिनारा एक पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते. लाखो लोक या भागात भेट देतात आणि अलीकडे इथे पर्यटन व्यवसायामध्ये देखील वाढ झालेली आहे.
Beach reserved for women in Bangladesh! Why cancel this decision in a few hours?
तर बांगलादेशमध्ये नुकताच या कॉक्स बाजार समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेने सारा देश हादरून गेला होता. त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा वर आला होता. त्यावेळी बऱ्याच महिलांनी समुद्रकिनाऱ्यावरचा काही भाग महिलांसाठी वेगळा आणि राखीव ठेवावा अशी मागणी केली होती.
Bangladesh: Students from Jammu and Kashmir, who are being brought back from Dhaka under #VandeBharatMission, express their gratitude towards Indian Govt.
तेव्हा सरकारनेदेखील कॉक्स बाजारचा 150 मीटर एवढा भाग महिलांसाठी राखीव म्हणून घोषित केला होता. पण त्यांच्या या निर्णयावर बरेच आढेवेढे घेण्यास सुरवात झालेली आहे. बऱ्याच लोकांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
महिलांना सुरक्षिततेची भावना मिळावी आणि समुद्र, निसर्ग यांचे सौन्दर्य, शांती मनसोक्त उपभोगता यावी यासाठी महिलांनी ही मागणी केली होती. गर्दीच्या ठिकाणी असुरक्षित वाटणे, नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटना यामुळे महिलांनीही मागणी केलेली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App