नाशिक : केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!, हेच राजकीय चित्र केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले.Congress couldn’t select Kerala Chief minister
– इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथा
केरळच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल चार तारखेला लागले. निकाल लागून आठवडा उलटला काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अजून केरळचा मुख्यमंत्री निवडता आला नाही. त्या उलट पश्चिम बंगालमध्ये शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तामिळनाडूमध्ये विजय जोसेफला बहुमत नसताना सुद्धा त्याने बहुमताचा जुगाड करून आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आसाम मध्ये भाजपने हेमंत विश्व शर्मा यांच्या नावावरच पुन्हा शिक्कामोर्तब केले. त्यांचा 12 मे रोजी शपथविधी होईल.
– केरळचे अधिकार काँग्रेस श्रेष्ठींना, पण…
पण या मोठ्या राजकीय पार्श्वभूमीवर केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा तिथला मुख्यमंत्री अजून निवडता आला नाही. केरळ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर तिथल्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री निवडायचे अधिकार काँग्रेसच्या श्रेष्ठींना देऊन टाकले. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी केरळ मधल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत पाचरणे केले. हे सगळे नेते मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक निघाले.
– मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक वाढले
रमेश चेन्निथला, शशी थरूर, के. सी. वेणूगोपाल, सनी जोसेफ या सगळ्यांनी एकत्रपणे आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसच्या श्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. सगळ्यांनीच मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचे घोडे पुढे दामटले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी कालच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुद्धा झाली. त्या बैठकीला राहुल गांधी हजर राहिले. पण तिथे देखील केरळच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात निर्णय होऊ शकला नाही.
– राहुल गांधी तामिळनाडूत, केरळचे घोंगडे भिजत
राहुल गांधी आज तामिळनाडूत गेले. तिथे त्यांनी विजय जोसेफ यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला हजेरी लावली. पण राहुल गांधींना केरळचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्यासकट काँग्रेसला टोला हाणायची संधी मिळाली. तामिळनाडू सरकार बनत नव्हते म्हणून काँग्रेसचे नेते भाजपला शिव्या देत होते. पण केरळमध्ये तर त्यांना बहुमत मिळाले तरीसुद्धा काँग्रेसला तिथला मुख्यमंत्री निवडता आला नाही, असा टोमणा मोदींनी हाणला. या सगळ्यात एकच बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे काँग्रेसचा साबण स्लो आहे. मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत भिजत पडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App