2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!


नाशिक : आज 31 डिसेंबर 2021 वर्षाअखेरीचे पार्टीचे प्लॅन्स आणि उद्याचे नववर्षांचे संकल्प यात अनेक जण मग्न आहेत. काँग्रेस पक्षानेही ही वर्षाअखेर एका अनोख्या पद्धतीने गाजवायचे ठरवले आहे.Gajatey Jumla Award Ceremony at the end of the year 2021

काँग्रेस यंदा संपूर्ण वर्षभर उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींना खास अवॉर्डने सन्मानित करत आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या “जुमला अवॉर्डचे” वेगवेगळे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अर्थातच 2021 चे सर्वात मोठे अवॉर्ड “जुमला फकीर अवॉर्ड” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाले आहे. पंतप्रधान नेहमी म्हणत असतात, “मैं फकीर हुं, झोला लेकर चला जाऊंगा”. त्यावरच खोचक शेरेबाजी करत काँग्रेसने त्यांना “जुमला फकिरी अवॉर्ड” प्रदान केले आहे. यामध्ये करोडो रुपयांची मर्सिडेस मेबॅक कार आणि आणि सेंटर विस्टा प्रोजेक्ट यांचे व्हिडिओ दाखवण्यात आले असून “ही पहा फकिरी” असेही त्याला टायटल देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींना “सेल्समन ऑफ द इयर” असेही जुमला अवॉर्ड देण्यात आले आहे. 70 वर्षात निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती त्यांनी 7 वर्षात विकून दाखवली, असे खोचक टायटल त्याला देण्यात आले आहे.



त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील “जुमला अवाॅर्ड” देण्यात आले असून “नजर होती है पैनी, तो बगल मे दिख जाते है टेनी”, असे टायटल दिले आहे.

 

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांना “अनर्थमंत्री 2021” हे जुमला अवॉर्ड देण्यात आले आहे. महागाई हे “धर्म संकट” असल्याचे विधान निर्मला सीतारामन यांनी केले होते. ती कधी हटणार हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. म्हणून त्यांना “अनर्थमंत्री 2021” हे अवॉर्ड देण्यात आले आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना “अडियल जुमला अवॉर्ड” प्रदान करण्यात आले आहे. केंद्र सरकार कृषि कायदे पुन्हा आणणार आहे असे वक्तव्य करून तोमर अडचणीत सापडले होते. म्हणून त्यांना “अडियल जुमला अवॉर्ड” देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खोचक पद्धतीने काँग्रेसने असा वर्षाच्या अखेरीला निशाणा साधून घेतला आहे.

Gajatey Jumla Award Ceremony at the end of the year 2021

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात